गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी यात्रा कमिटी सैनिक टाकळी व गुरुदत्त शुगर टाकळीवाडी व गुरुदत्त शुगर सर्व कर्मचारी यांच्या सौजन्याने भव्य बैलगाडी ( बिना लाठी काठी ) शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा दोन गटात होत आहे.अ गट जनरल बैलगाडी स्पर्धा व ब गट स्पर्धा.
जनरल शर्यतीसाठी बक्षिसे प्रथम क्रमांक १,००,००१ रुपये ढाल व निशाण , द्वितीय क्रमांक ७१,००१ ढाल व निशाण, तृतीय क्रमांक ७१,००१ ढाल व निशाण.
ब गट शर्यतीसाठी बक्षिसे प्रथम क्रमांक ३१,००१ रुपये ढाल व निशाण , द्वितीय क्रमांक २१,००१ ढाल व निशाण, तृतीय क्रमांक ११,००१ ढाल व निशाण.
अ गटासाठी १०,००० रु प्रवेश फी असून ब गटासाठी ३००० रु प्रवेश फी आहे .
नियम व अटी :
१) गाडीमागे मोटर सायकल लावल्यास नंबर दिला जाणार नाही.
२) अपघात झाल्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही.
३) पंचांचा निर्णय अखेरचा राहील.
४) ५ गाडी आलेशिवाय मैदान सोडले जाणार नाही.
५) लम्पी सर्टिफिकेट,बैल मालकांचे आधार कार्ड ,बैलांचा फोटो सोबत आणणे.