गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी शर्यत शौकीन नेर्ली यांच्यातर्फे विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे .
जनरल अ बैलगाडी , जनरल ब गट बैलगाडी , दुस्सा- चौसा बैलगाडी, निस -नवतर / एक दोन पट्टा पाळलेला आदत बैलगाडी शर्यत तसेच जनरल घोडागाडी,नवतर घोडागाडी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक प्रकारात चार नंबर काढले जातील. जनरल अ गट बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्र.३१ हजार द्वितीय २१ हजार तृतीय ११ हजार चतुर्थ ७ हजार व ढाल निशाण अशी बक्षिसे आहेत . जनरल ब गट बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्र.२१ हजार द्वितीय १५ हजार तृतीय ११ हजार चतुर्थ ५ हजार व ढाल निशाण अशी बक्षिसे आहेत.दुस्सा-चौसा बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्र.१५ हजार द्वितीय ११ हजार तृतीय ७ हजार चतुर्थ ३ हजार व ढाल निशाण अशी बक्षिसे आहेत. जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्र.७ हजार द्वितीय ५ हजार तृतीय ३ हजार चतुर्थ २ हजार व ढाल निशाण अशी बक्षिसे आहेत . नवतर घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्र.५ हजार द्वितीय ३ हजार तृतीय २ हजार चतुर्थ १ हजार व ढाल निशाण अशी बक्षिसे आहेत .
नियम व अटी :
१) मैदान हे शासकीय नियमानुसार होणार आहे.
२) मैदानला येताना मालकाचे आधार कार्ड ,लम्पी सर्टिफिकेट, बैलांचे फोटो गाडीवानाचे आधार कार्ड आवश्यक आहे.
३) दुस्सा-चौसा आणि बिनदाती बैल व घोड्याचे दात चेक करण्यात येतील .
४) मैदानला बटरी व लाठी काठी चालणार नाही .
५) निस नवतर व आदत खोंड २/३ पट्टे पळलेलाच पाहिजे.