मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी नरंदे ता- हातकणंगले जि- कोल्हापूर येथे विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे .
जनरल बैलगाडी शर्यत , बिनदाती जनरल बैलगाडी शर्यत ,तसेच जनरल घोडागाडी शर्यत , सुट्टा घोडागाडी शर्यत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
बैलगाडी शर्यतीत प्रत्येक प्रकारात चार नंबर काढले जातील. जनरल बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्र.२५ हजार द्वितीय २० हजार तृतीय १५ हजार चतुर्थ ५ हजार अशी बक्षिसे आहेत. बिनदाती जनरल बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्र. १० हजार द्वितीय ७ हजार तृतीय ५ हजार चतुर्थ ३ हजार अशी बक्षिसे आहेत.
घोडागाडी शर्यतीत प्रत्येक प्रकारात तीन नंबर काढले जातील . जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्र. १० हजार द्वितीय ७ हजार तृतीय ५ हजार अशी बक्षिसे आहेत. सुट्टा घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम क्र. ५ हजार द्वितीय ३ हजार तृतीय २ हजार अशी बक्षिसे आहेत.
नियम व अटी :
१) एका गाडीत एकच चालक
२) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
३) स्पर्धा दिनांक ४/२/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता होईल.
स्पर्धेचे ठिकाण : शरद कारखाना माळ